व्हेरीकोज व्हेन्ससाठी एंडोव्हीनस लेसर थेरपी
डॉ. गौतम गांगुर्डे
प्लास्टिक, रिकॉन्संट्रेक्टिव्ह आणि कॉस्मेटिक सर्जन.

व्हेरीकोज व्हेन्स म्हणजे काय ?
टच्च फुगलेल्या , वेड्या वाकडया , नागमोडी रक्त वाहिन्यांना व्हेरीकोज व्हेन्स म्हणतात .

व्हेरीकोज व्हेन्स कशामुळे होतात ?
व्हेरीकोज व्हेन्स हा जरी आजार , नसला तरी ती पायाच्या शिरांतील झडपा खराब झाल्याने निर्माण झालेली स्थिती
आहे .
धावपळीच्या जीवनात कमी झालेला व्यायाम अथिक काळ होणारे बैठे काम , उभे राहून केलेल्या कामामुळे व्हेरीकोज
व्हेन्सचे रुग्ण वाढत आहेत.
त्यामुळे पायांकडून ते ह्रदयाकडे रक्त पुरवठा सुरळीत होत नाही. ते रक्त पुन्हा शिरांत परत येते ज्यामुळे लवचिक
शिरा ह्या अतिरिक्त रक्तामुळे फुगतात आणि व्हेरीकोज व्हेन्स बनतात.
व्हेरीकोज व्हेन्स होण्यामागील अनेक कारणे आहेत ?
१) अनुवांशिकतेतून आलेली शिरांच्या भिंतीतील अनजवी लवचिकता
२) पायांच्या स्नायूंची कमी झालेली हालचाल
३) स्थुलता
४) गर्भारपण
५) डिप व्हेन्स थ्राम्बोसिस अर्थात पायांच्या आतील शिरांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणे.

व्हेरीकोज व्हेन्स होण्याचे प्रमाण किती आहे ?
किमान अर्ध्यालोकसंख्येला तरी काहींना काही स्वरूपात शिरांचे आजार असतात. पन्नाशी नंतर किमान दोह्यांपैकी
एकाला आणि वयोवृध्द गटातील १५ ते २५ % टक्के लोकांना व्हेरीकोज व्हेन्स असू शकतात.

व्हेरीकोज व्हेन्सची लक्षणे ?
व्हेरीकोज व्हेन्सची लक्षणे पायाच्या ताठरलेल्या शिरांवरून समोर येतात, पण शारीरिक ताण म्हणून त्याकडे दूर
दुर्लक्ष केले जाते. पण त्यानंतर पाय दुखणे, रात्रीचे पायात गोळे येणे, ही लक्षणे पहिल्या टप्यात आढळून येतात.
दुसऱ्या टप्यात फुगलेल्या शिरा वेड्यावाकड्या होतात, तर तिसऱ्या टप्यात शिरांतील रक्तदाब प्रमाणाबाहेर
वाढल्याने घोट्याजवळ सूज येण्यास सुरुवात होते. रक्तातील लाल पेशी केशवाहिन्यांतून झिरपून बाहेर पडतात.
पाचव्या टप्यात काही वर्षानंतर घोट्याजवळील त्वचा कडक बनते तर अखेरच्या टप्यात रक्ताच्या कमतरतेमुळे
आधीच कमकुवत झालेल्या त्वेचेवर जखमा तयार होतात. त्या वारंवार उपचार करूनही भरून येणे अवघड बनू
लागते. अशातून व्हेरीकोज अल्सर्समुळे कित्येंकांचे जगणे अवघड होऊन बसते. व्हेरीकोज व्हेन्सला ग्रामीण भाषेत
नागीण म्हणून ओळखली जाते.

एंडोव्हीनस लेसर थेरपी म्हणजे काय ?
चढत्या उतरत्या नागिणीवर आतापर्यंत स्केरोझन्ट इंजेकशन, छोट्याशा शस्त्रक्रियांनी शिरेतील अडथळा ठरणारे
भाग काढणे,स्ट्रिपिंग शस्त्रक्रियेच्या उपचार पध्दती वापरल्या जात होत्या. पण त्यात भुलेची जोखीम शिरांत होणारा
रक्तस्राव, इंजेकशननंतर येणारी सूज, दीर्घकाळ घ्यावी लागणारी विश्रांती आणि त्यातूनही दिसून येणारे व्रण हे धोके
दिसत होते. त्यामुळे व्हेन स्ट्रिपिंग ऑपेरेशनला रुग्ण सहसा तयार होत नसत. पण सध्या या सर्वावर पर्याय म्हणून
अत्याधुनिक एंडोव्हीनस लेसर थेरपी वापरात येते.

एंडोव्हीनस लेसर थेरपी ही शस्त्रक्रिया या प्रकारात मोडत नाही आणि संपूर्ण प्रोसीजरला एका तासाहून कमी वेळ
लागतो. प्रोसीजर वेळी तुम्ही पूर्णपणे जागे असतात आणि फक्त तुमच्या पायांना भूल दिलेली असते. अत्यंत बारीक
असा लेजर फायबर तुमच्या पायांतील फुगलेल्या शिरांत टाकले जाते आणि लेजर ऊर्जा फायबर सोबत दिली जाते
ज्यामुळे फुगलेल्या शिरा बंद होतात .

एंडोव्हीनस लेसर थेरपी ही वेदनादायी आहे का ?
सामान्यपणे एंडोव्हीनस लेसर थेरपी ही वेदनाविरहित आहे.

एंडोव्हीनस लेसर थेरपी नंतर रुग्णानाने काय केले पाहिजे ?
एंडोव्हीनस लेसर थेरपी नंतर रुग्णाला लवकरात लवकर चालण्यासाठी प्रवृत्त केले जाते आणि त्याने पायांतील
कॉम्प्रेशन स्टोकिंग नियमित घालणे गरजेचे असते.

एंडोव्हीनस लेसर थेरपीचे फायदे ?
एंडोव्हीनस लेसर थेरपी नंतर रुग्ण एक किंव्हा दोन दिवसातच पूर्णपणे आपली दैनंदिन कामे करू शकतो.
शिरांत होणारा रक्तस्राव, इंजेकशननंतर येणारी सूज, दीर्घकाळ घ्यावी लागणारी विश्रांती आणि त्यातूनही दिसून
येणारे व्रण या पासून रुग्णाची सुटका.

डॉ गौतम गांगुर्डे
प्लास्टिक, रिकॉन्संट्रेक्टिव्ह आणि कॉस्मेटिक सर्जन
सुतेज लेजर आणि कॉस्मेटिक क्लीनिक
ठक्कर बझार, पहिला मजला, नवीन सी बी स, त्रिंबक रोड, सी.बी.स, नाशिक – ४२२००२
8390060084, 9422246460
www.drgautamgangurde.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *